लोणावळेकरांनो खबरदार ! बंगले भाड्याने देणार असाल, तर ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

  • लोणावळ्यातील बैठकीत प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचा इशारा 

लोणावळा : "हॉटेल, रिसॉर्टमध्ये सॅनिटायझेशन करण्याची यंत्रणा राबविणार असल्याने पर्यटकांना थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बंगल्यांमध्ये अशी कोणतीही यंत्रणा नसते. त्यामुळे लोणावळ्यातील बंगले पर्यटकांना भाड्याने देणे गुन्हा असून, बंगले भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे,'' अशा इशारा प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिला. 

लोणावळा नगर परिषदेची दंडमाफीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 

लोणावळा नगरपरिषद हद्दीत कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शिर्के यांनी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी शिर्के बोलत होते. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवी पवार, नगरसेवक उपस्थित होते. शिर्के म्हणाले, "कोरोनास बळी पडणाऱ्यांमध्ये वयस्कर नागरिक अधिक आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतांशी नागरिक अन्य व्याधींनी ग्रस्त होते. विनाकारण बेड अडविणे, रुग्णालयात जाणे टाळण्याबरोरच सौम्य लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. मावळात ऑक्‍सिजन पुरवठा मर्यादित होत असल्याने कमतरता भासत आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढविणार आहे.'' नगरसेवक देविदास कडू म्हणाले, "लॉकडाउन शिथिल झाल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मावळात जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर भर असून, कोविड केअर सेंटरला मदत दिली जात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विभागवार जनजागृती करण्याची गरज आहे. 
- संदेश शिर्के, प्रातांधिकारी 

'आणखी एक सेंटर उभारणार' 
लोणावळ्यात झालावाडी कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहत आणखी एक स्वॅब संकलन सेंटरसह कोविड केअर सेंटरची उभारणी करणार आहे. तसेच एक रुग्णवाहिका नगर परिषद खरेदी करणार असल्याची माहिती घेत असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action for renting bungalows in Lonavla