'रंगभूमी, चित्रपटांना रसिक पुन्हा गर्दी करतील', अभिनेते प्रशांत दामले काय म्हणाले? वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

"कोरोनामुळे सध्या भितीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम रंगभूमी व चित्रपट सृष्टीवरही झाला आहे. मात्र, रसिक पुन्हा चित्रपट व नाटकांना गर्दी करतील,'' असा विश्‍वास प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. 

पिंपरी : "कोरोनामुळे सध्या भितीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम रंगभूमी व चित्रपट सृष्टीवरही झाला आहे. मात्र, रसिक पुन्हा चित्रपट व नाटकांना गर्दी करतील,'' असा विश्‍वास प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व सिंबायोसिस स्किल ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे 'रंग बदलत्या नॉर्मलचे' विषयावर ऑनलाइन आयोजित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी दामले बोलत होते. 'कोविडनंतर फिल्म आणि थिएटर' असा चर्चासत्राचा विषय होता. प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर व नाटककार अभिराम भडकमकर यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, रजिस्टार बी. बी. पाटील, डॉ. गिरीश रांगणेकर आदी उपस्थित होते. भडकमकर म्हणाले, "नाटक-चित्रपटातील नवनवीन बदल व येणाऱ्या काळात प्रेक्षकांच्या अपेक्षा रुंदावलेल्या असतील. लेखक व सादरकर्ते यांना वेगवेगळ्या आव्हानांसोबतच संधीचीही मोठी कमाई आगामी काळात मिळणार आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रेक्षकांची अभिरुची आणि आवड जोपासण्यासाठी नाटक, चित्रपट क्षेत्रातील मंडळींना विशेष प्रयत्न करावे लागतील. 
- राहुल सोलापूरकर, अभिनेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor prashant damle believes that theater and movies will be crowded again