निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

आजचा दिवस गाजरे यांच्या आयुष्यत अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही. 35 वर्ष महापालिकेत वाहनचालक म्हणून सेवा देणारे सेवानिवृत्त झाले. गाजरे यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचे अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं. त्यांनी स्वत: गाजरे यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी 35 वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे  हे ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं. तुपे गाडी चालवत होते आणि त्यांचे ड्रायव्हर दत्तात्रय गाजरे ऐटीत मागे बसलेत,  असं चित्र महापालिकेत पाहायला मिळालं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजचा दिवस गाजरे यांच्या आयुष्यत अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही. 35 वर्ष महापालिकेत वाहनचालक म्हणून सेवा देणारे सेवानिवृत्त झाले. गाजरे यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचे अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं. त्यांनी स्वत: गाजरे यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या कार्यालयापासून ते गाजरे यांच्या निवास स्थानापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दत्तात्रय यांना आपल्या जागेवर बसविले. यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात महापौरांनी त्यांना सन्मानित केलं.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू असताना कर्मचाऱ्यांनी काम बंद पाडले

आयुष्यभर आपल्या साहेबांना इच्छितस्थळी सुखरुप पोहोचविणारे दत्तात्रय गाजरे, हे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या सन्मानाने गहिवरून गेले. अतिरिक्त आयुक्तांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळे  सध्या तुपे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 

डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional Commissioner for Retired Driver Uncle became Driver himself