Pimpri : प्रशासन अधिकारी हरी भारती यांचे कोरोनामुळे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासन अधिकारी हरी भारती यांचे कोरोनामुळे निधन

प्रशासन अधिकारी हरी भारती यांचे कोरोनामुळे निधन

पिंपरी : माजी शिक्षण उपसंचालक व पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी हरी भिवा भारती (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून -जावई असा परिवार आहे. ते जुनी सांगवी येथे स्थायिक होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी (ता.२६) मृत्यू झाला.

भारती यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून २००८ ते २०१० या कालावधीत कामकाज पाहिले होते. तसेच निवृत्तीनंतर ते सांगवीतील नृसिंह गृहरचना संस्था मर्यादित, नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभाग, श्री तुळजाभवानी विद्यालय (सोमाटणे), श्री ज्योतिबा विद्यालय (बेबेड ओहोळ) याठिकाणी मार्गदर्शव करत होते. हसतमुख स्वभावाच्या भारती सरांच्या मृत्यूने प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भारती यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून २००८ ते २०१० या कालावधीत कामकाज पाहिले होते. शांत, हसतमुख असल्याने ते सुपरिचित होते. तसेच निवृत्तीनंतर ते सांगवीतील नृसिंह गृहरचना संस्था मर्यादित, नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभाग, मावळातील श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, श्री ज्योतिबा विद्यालय बेबेड ओहोळ याठिकाणी कार्यरत होते. हसतमुख स्वभावाच्या भारती सरांच्या मृत्यूने प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top