VIDEO : पिंपळे सौदागरमधील विराज जगताप हत्या प्रकरणाबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले...

टीम ई-सकाळ
Sunday, 14 June 2020

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

पिंपरी : विराज जगताप याची प्रेमकरणातून हत्या करण्यात आली आहे. त्या प्रकरणाला जातीयतेचा वास आहेच, यात दुमत नाहीत. परंतु, सोशल मीडियावर एकमेंकावर वाईट पद्धतीने लिहिण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला महिलांचा आदर करायला शिकवलेले आहे. त्यामुळे हा संदेश आपल्याला पाळलाच पाहिजे. मानलाच पाहीजे. त्यामुळे सोशल मीडियावर खोडसाळपणे तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हिडिओ फोटो त्वरीत थांबवाव्यात. परिस्थिती बिघडणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     

पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या बौद्ध तरुणाची रविवारी रात्री (ता. 7) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचे पडसाद राजकीय पटलावरदेखील उमटले आहेत. शनिवारी (ता.13) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन "विराजची हत्या ही घटना अंत्यत गंभीर असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधित घटनेतील तरुणीला सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे आरोपींच्या कुटुंबाबाबत आक्षेपार्ह पोस्ट तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. त्या व्हिडीओत संबंधित मुलीचा व तिच्या आईचाही फोटो वापरण्यात आला आहे. या पोस्टमधून एकमेंकावर खोडसाळपणे, हेतूपुरस्कर लिहिण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीच हाताबाहेर जाईल. पोस्टमधून महिलांचा अपमान करू नये, म्हणून त्वरीत या पोस्ट थांबविण्याचे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adv prakash ambedkar talks about viraj jagtap murder case