
पिंपरी - ""बहुसंख्य लोक आपल्या श्वानांना शी-शू साठी सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर, पदपथांवर, उद्यानात आणतात. इतर नागरिकांना हा त्रास का? महापालिकेच्या स्वच्छता कामगारांनी ही जबाबदारी आहे? श्वानप्रेमी घरातल्याच स्वच्छतागृहात श्वानांना विधी करण्याची सवय का लावत नाहीत? अद्याप एकही व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्याचे मलमूत्र साफ करताना मी अजून पाहिलेले नाही'', अशी तक्रार निगडी प्राधिकरणातील वंशिका भाटिया यांची आहे. त्यांच्याप्रमाणे बहुतांश नागरिक रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे त्रासले आहेत. आरोग्यासाठी म्हणून फिरायला जाणाऱ्या नागरिक याबाबत संबंधित श्वान मालकांना सुनावतही आहेत.
नागरिकांना उघड्यावर शौचाला बसण्यावर सरकारने बंदी आणली आहे. दुसरीकडे रस्त्यांवर श्वानांना विष्ठेसाठी घेऊन येत नियमाचे सर्रास उल्लंघनच करणे सुरू आहे. शहराच्या विविध भागांत पाळीव श्वानांचे प्रमाण लक्षणीय असून, रोज सकाळी, दुपारी आणि सायंकाळी नागरिक या श्वानांना फिरायला घेऊन जातात. कधी ते रस्त्यावर, पदपथावर, तर कधी बागेत फिरतात. त्यांच्या विष्ठेमुळे सार्वजनिक परिसर अस्वच्छ होत असून, दुर्गंधी मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वर्ष झाले तरी कारवाई शून्यच
नगरविकास विभागाने 1 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करतील, त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा नोव्हेंबर 2019 रोजी रस्त्यावर पाळीव प्राण्यांची अस्वच्छता केल्यास त्यांच्या मालकांना जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या वर्षात एकाही मालकावर आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई केली नाही. क्षेत्रीय कार्यालयाने उपद्रव विरोधी पथकामार्फत कारवाईत्मक दंड वसूल केला पाहिजे.
परवानाधारक - 515 (पाळीव श्वान)
परवाना शुल्क - 75 रुपये (वार्षिक)
नूतनीकरण शुल्क - 60
पुणे महापालिका पाचशे रुपये दंड
पुणे महापालिका पाळीव श्वानाला प्रातर्विधीसाठी रस्त्यावर घेऊन जाणाऱ्यांना मालकांना 500 रुपये दंड ठोठावत आहे. त्याविरुद्ध चित्र पिंपरी महापालिकेत पाहायला मिळत असून, आरोग्य विभागाने निव्वळ पत्रक काढून प्रसिद्धी मिळवली. तसेच दंडाची रक्कमही निश्चित केली नाही.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नागरिकांच्या तक्रारी
अजमेरा कॉलनीतील थॉमस कुरुविल्ला म्हणाले, ""भटक्या कुत्र्यांच्या तुलनेत घरातील पाळीव श्वानाबद्दल कोणी साधारणपणे तक्रार करीत नाही,पण हे श्वान रात्री बेरात्री भुंकून माणसांना हैराण करतात, हे सत्य आहे.''
प्राधिकरणातील विजय सावंत म्हणाले, ""सार्वजनिक ठिकाणी ते उपद्रव करणार नाहीत, याची काळजी मालकाने घ्यावी. या पाळीव प्राण्यांमुळे प्रचंड मनस्ताप होत आहे. ''
दिघीतील सचिन बनसोडे म्हणाले, "" प्राणी पाळणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे बंधनकारक आहे. आपल्या प्राण्यांमुळे इतरांना उपद्रव होऊ नये.''
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निगडीतील शिवानंदन केशवन म्हणाले, ""सोसायटीत, रस्त्यावर घाण करणार नाही आणि ती केल्यास आपण स्वतः:हून साफ करणे, हे तत्त्व मालकाने पाळलेच पाहिजे. ''
""याबाबत अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. परंतु लवकरच कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल.''
-डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.