Ajit Pawar
sakal
पिंपरी-चिंचवड
Ajit Pawar: नदी सुधार प्रकल्पाबाबत समन्वय ठेवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महापालिका आयुक्तांना सूचना
River Improvement: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवण्याचे महापालिका आयुक्तांना सांगितले. पावसाळ्यात पूर, जलप्रवाहातील अडथळे आणि नदी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
पिंपरी : ‘‘नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबविताना मुळा व मुठा नद्यांवर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, नदी स्वच्छता, जलप्रवाहातील अडथळे दूर करावेत. पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात,’’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांना सोमवारी (ता.२९) दिल्या.