
Ajit Pawar
sakal
पिंपरी : नातवाला रोज शाळेत सोडायला जावे लागते. घरापासून निघाल्यानंतर वाटेत एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही; महिलांचीही त्यामुळे गैरसोय होते. ठिकठिकाणी उद्याने उभारण्यात आली आहेत, मात्र स्वच्छतागृहे बांधलेली नाहीत...रहाटणीतील ७१ वर्षीय जयवंत खनेकर यांनी उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलेली अशी गाऱ्हाणी प्रातिनिधिक ठरली. त्यावर कार्यवाहीच्या सूचना देतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी (ता. १५) दिली.