
पिंपरी : ‘‘अनधिकृत जाहिरात फलक लावणारा, त्याला सहकार्य करणारा जागामालक आणि मंडपवाला यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय आम्ही नुकताच घेतला. मुख्यमंत्री फडणवीस आणि माझ्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृतपणे लाकडी सांगाडे उभारून जाहिरात फलक लावणारा राजकीय कार्यकर्ता किंवा इतर कोणी असेल; त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी,’’ असा सूचनावजा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. २३) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना चिंचवड येथे सभेत दिले.