Pimpri Chinchwad News : एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे पाणी वाया; पाटील विद्यालयात फुटलेल्या जलवाहिनीवरून स्थानिकांचा आक्रोश!

Pipeline Burst : आकुर्डी परिसरातील कै. वसंतदादा पाटील विद्यालयाच्या आवारातील जलवाहिनी मागील तीन दिवसांपासून फुटलेली असून, या काळात हजारो लिटर पाणी विनाकारण वाहून गेले आहे.
Water pipeline leakage inside Vasantdada Patil School premises in Akurdi

Water pipeline leakage inside Vasantdada Patil School premises in Akurdi

Sakal

Updated on

आकुर्डी : परिसरात पाण्याची टंचाई भासत असताना एवढ्या प्रमाणात पाणी वाया जाण्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल तयार झाला असून क्रीडा उपक्रम, व्यायामाचे तास आणि विद्यार्थ्यांचे रोजचे खेळणे पूर्णपणे ठप्प झाले आहे. मैदानातील अस्वच्छता आणि घसरडा चिखल यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा परिणाम झाला आहे. या मैदानातच सध्या महा-मेट्रोचे दोन पिलर तयार करण्याचे काम सुरू आहे, तसेच पिलर बांधकामासाठी लागणारी जड यंत्रसामग्री आणि साहित्य मैदानात ठेवलेले आहे. आधीच चिखल असताना या यंत्रसामग्रीमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com