esakal | महापालिकेचा उपक्रम; कल्याणकारी योजनांसाठी आजपासून अर्जवाटप
sakal

बोलून बातमी शोधा

pcmc

सर्व अर्ज मोफत मिळणार असून, स्वीकृतीवेळी केवळ ४० रुपये शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

महापालिकेचा उपक्रम; कल्याणकारी योजनांसाठी आजपासून अर्जवाटप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाअंतर्गत महिला बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग कल्याणकारी आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जवाटप आणि स्वीकृती २७ ऑक्‍टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सर्व नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी होईल. सर्व अर्ज मोफत मिळणार असून, स्वीकृतीवेळी केवळ ४० रुपये शुल्क आकारण्यात येईल, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

यांना मिळणार अर्थसाह्य
 महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत : विधवा, घटस्फोटित महिला, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दहावीतील विद्यार्थ्यांनी, आयटीआयमधील मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी, दीड वर्षे पूर्ण झालेले महिला बचतगट, मुलगी दत्तक घेणारे दांपत्य. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 अस्तित्व पुनर्वसन योजनेअंतर्गत : पीडित महिला, पहिल्या मुलीच्या जन्मानंतर अथवा पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारी महिला, रामभाऊ म्हाळगी मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी, परदेशातील उच्चशिक्षण व अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या युवती, दहा वर्षे पूर्ण झालेले महिला बचतगट, बारावीनंतर वैद्यकीय (एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, बीयूएमएस) एमबीए, अभियांत्रिकी, असे उच्च शिक्षण घेणाऱ्या युवती.

 मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत : पाचवी ते दहावीत शिकणारे; बारावीनंतर वैद्यकीय, एमबीए व अभियांत्रिकी उच्च शिक्षण घेणारे आणि परदेशात उच्चशिक्षण घेणारे मागासवर्गीय विद्यार्थी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत : उपयुक्त साधने खरेदी, बारावीनंतर वैद्यकीय, एमबीए, अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी, विशेष व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या संस्था अथवा पालक. संत गाडगे महाराज दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य, पंडित दीनदयाळ उपाध्याय पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणारे अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत : दहावी व बारावीत ८० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी. एचआयव्ही आणि एड्‌स बाधित मुलांचा सांभाळ करणारे पालक व संस्था.

अधिक माहितीसाठी
नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, संपर्क : ९८५०७२७३२०