esakal | चौदा हजार द्या, नाहीतर रुग्णाला रस्त्यावर ठेऊन जाईन; अ‍ॅम्ब्युलन्स चालकाची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

पैसे स्वीकारताना महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

"चौदा हजार द्या, नाहीतर रुग्णाला रस्त्यावर ठेऊन जाईन"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी pipmari-chinchwad news- चौदा हजार रुपये द्या, नाहीतर रुग्णाला रुग्णवाहिकेतून (Ambulance) रस्त्यावर ठेऊन निघून जाईल, अशी धमकी देत. रुग्णाचे काही बरे वाईट झाल्यास तुम्ही पाहून घ्या, अशी भीती दाखवून रुग्णवाहिका चालकाने (Ambulance driver) ठरलेल्या दरापेक्षा जादा दराने तब्बल चौदा हजार रुपये उकळले. तसेच पैसे स्वीकारताना महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Ambulance driver arrested for charging more than the stipulated rate)

किशोर शंकर पाटील (वय ४५, रा. साई चौक, नवी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रुग्ण महिलेच्या मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेच्या वडिलांचे २३ एप्रिलला कोरोनाने निधन झाले. काही दिवसातच त्यांच्या आईलाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र, वायसीएममध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने थेरगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार महिलेने किशोर पाटील याची खासगी रुग्णवाहिका अडीच हजार रुपये देऊन बुक केली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कोविशिल्डचे पाच हजार डोस

गुरुवारी (ता. ६) सायंकाळी पाचला रुग्णाला थेरगावातील रुग्णालयात आणले असता व्हेंटिलेटर बेड दुसऱ्या रुग्णाला दिला गेल्याचे समजले. रुग्ण महिला रुग्णवाहिकेत असतानाच त्यांची मुलगी बेडसाठी धावाधाव करीत होती. तर किशोर पाटील तेथून निघण्यासाठी घाई करीत होता. तक्रारदार महिला विनंती करूनही तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तेथे बेड उपलब्ध न झाल्याने रुग्णाला पुन्हा वायसीएम रुग्णालयात न्यायचे होते. त्यावेळी 'तुम्ही अगोदर मला १४ हजार रुपये द्या, नाहीतर मी तुमच्या आईला रुग्णवाहिकेतून खाली रस्त्यावर उतरून निघून जाईल, मग त्यांचे काही बरे वाईट झाल्यास तुम्ही पाहून घ्या' अशी भीती दाखवली आणि अवघ्या नऊ किलोमीटरच्या अंतरासाठी तक्रारदार महिलेकडून तब्ब्ल १४ हजार रुपये घेतले. पैसे स्विकारताना आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन केले. दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित महिलेने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली असता त्याच्यावर किशोर पाटील याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे