मावळसाठी सहा केंद्रांना रुग्णवाहिका; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

  • चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी

वडगाव मावळ : पुणे जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातून मावळ तालुक्‍यातील सहा प्राथमिक केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 14 चौदाव्या वित्त आयोगातून पुणे जिल्ह्यातील 92 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 लाख 42 हजार रुपये किमतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील विधानभवन येथे शुक्रवारी झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, सभापती प्रमोद काकडे, बाबूराव वायकर, पूजा पारगे, सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, संदीप कोहिनकर,आरोग्य अधिकारी भगवान पवार आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मावळ तालुक्‍यातील आढले खुर्द, खडकाळा, तळेगाव दाभाडे, टाकवे बुद्रूक, कार्ला व येळसे या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका पवार यांच्या हस्ते कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर व आढले गावचे सरपंच विश्वास घोटकुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambulances to six centers in maval, dedication by deputy chief minister