
Ancient Temple
Sakal
पिंपरी : चिंचवडगावातील गावडे जलतरण तलावाजवळ भग्नावशेषातील छोटी प्राचीन मंदिर रचना आढळून आल्याने चिंचवडकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी केलेल्या साफसफाईदरम्यान एकाच दगडी चौरंगावर गणपतीची मूर्ती, रिद्धी-सिद्धी तसेच शिवलिंगासह कोरल्याची संरचना समोर आली. ही संरचना सुमारे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे.