हिंजवडी - अंगणवाडीच्या सुरक्षा दरवाजाला कुलूप लावून सेविका आणि मदतनीस ग्रामपंचायतीच्या बैठकीला गेल्या. यावेळी खोलीत २० मुले होती. कोंडल्यामुळे ती रडू लागली. ही माहिती एका पालकाने अधिकाऱ्यांना कळविली..त्यानंतर धावत आलेल्या सेविकांनी मुलांची सुटका केली. हा धक्कादायक प्रकार हिंजवडीच्या म्हातोबा टेकडीजवळील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये बुधवारी (ता.२६) घडला.सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे या दोघी अंगणवाडीत कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या बैठकीला जाण्यासाठी दोघींनी मुलांना वर्गखोलीत कोंडले. मुलांना घेण्यासाठी आलेल्या पालकांनी अंगणवाडीला कुलूप पाहून महिलांना फोन केले, पण प्रतिसाद मिळाला नाही..अखेर एकात्मिक बालविकास योजनेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. वरिष्ठांचा फोन गेल्यावरच सेविका-मदतनीस परतल्या आणि त्यांनी अंगणवाडीचे दार उघडले. या घटनेमुळे संतापलेल्या पालकांनी लेखी तक्रार दाखल करणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. .हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर म्हणाले, ‘‘अंगणवाड्यांवर पंचायत समिती नियंत्रण ठेवते. देखभाल-दुरुस्ती तसेच वर्गखोल्या आणि मुलांसाठी आम्ही योग्य ती मदत करतो. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे अधिकारी या प्रकारणाचा योग्य तपास करतील.’’.एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम म्हणाले, ‘‘अंगणवाडीत घडलेला प्रकार गंभीर आहे. सेविका व मदतनीस यांच्याकडून अहवाल मागवला असून, चौकशी सुरू आहे. निष्काळजीपणा आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.’’दरम्यान, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ‘ग्रामपंचायतीतील एका बैठकीसाठी सेविका आणि मदतनीस यांना बोलविले होते. जाताना त्यांनी सुरक्षा दरवाजाला कुलूप लावले होते. बालकांना आत ठेवून बैठकीस उपस्थित राहणे गंभीर आहे.’’ याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी घेतली असून सविस्तर अहवाल मागविला आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या..मुलाची प्रकृती बरी नसल्याने मला सेविकेने फोन केला. मी तेथे गेले. पण, सुरक्षा दरवाजाला कुलूप लावून त्या दोघी बैठकीला गेल्या होत्या. मुले रडत होती. सेविकेने फोन उचलला नाही. परत आल्यावर उद्धटपणे उत्तरे दिली.- उज्ज्वला जोगदंड, पालक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.