esakal | मावळ तालुक्‍यातील 'या' 51 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक
sakal

बोलून बातमी शोधा

मावळ तालुक्‍यातील 'या' 51 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक

कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका घेणे अशक्‍य असल्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तींची निवड करण्याचे आदेश सरकारने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते.

मावळ तालुक्‍यातील 'या' 51 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यातील शुक्रवारी (ता. 21) पंचवार्षिक मुदत संपलेल्या 51 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासकांची नेमणूक केली, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर व सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका घेणे अशक्‍य असल्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तींची निवड करण्याचे आदेश सरकारने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रसाद यांनी ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. पंचायत विस्तार अधिकारी बी. बी. दरवडे यांची बारा ग्रामपंचायतींवर, एम. टी. कारंडे यांची तेरा ग्रामपंचायतीवर, शिक्षण विस्तार अधिकारी एस. आर. वाळूंज यांची नऊ ग्रामपंचायतींवर, कृषी विस्तार अधिकारी एस. बी. मेंगडे यांची नऊ ग्रामपंचायतींवर तर एस. जी. म्हसे यांची आठ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सरपंचांचे अधिकार व कर्तव्ये प्राप्त झाली आहेत. 

प्रशासक व त्यांच्याकडील ग्रामपंचायती पुढील प्रमाणे : 

  • बी. बी. दरवडे : साते, पाटण, महागाव, कुरवंडे, खडकाळा, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, मळवली, कार्ला, साई, कुसगाव बुद्रूक. 
  • एम. टी. कारंडे : आपटी, थुगाव, शिवणे, उकसाण, डाहुली, शिरदे, वडेश्‍वर, धामणे, ऊर्से, गहुंजे, आंबी, सोमाटणे, परंदवडी. 
  • एस. बी. मेंगडे : खांडशी, वारू, अजिवली, मोरवे, कुसगाव खुर्द, आढले खुर्द, तिकोना, पाचाणे, कुसगाव पमा. 
  • एस. जी. म्हसे : शिवली, सांगवडे, येलघोळ, बऊर, करंजगाव, चिखलसे, टाकवे बुद्रूक, दारुंब्रे. 
  • एस. आर. वाळूंज : कशाळ, मळवंडी ठुले, नाणे, माळेगाव बुद्रूक, कोथुर्णे, खांड, घोणशेत, आढे, येळसे.  

 
 

loading image