
Pimpri Crime
Sakal
पिंपरी : ‘मोठ्याने बोलू नका’, असे सांगितल्याने ताथवडेतील अशोकनगर येथील कामगार वसाहतीमध्ये मद्यपान करताना दोन गटांत हाणामारी झाली. त्यात एका कामगाराच्या डोक्यात लोखंडी हुक लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.