Nisarg Cyclone : तब्बल 110 झाडं कोसळली एका दिवसात!

Nisarg Cyclone : तब्बल 110 झाडं कोसळली एका दिवसात!
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (ता.३) झालेल्या तूफान वादळी वाऱ्याच्या पावसात शहरात तब्बल ११० मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. तर नागरिकांच्या झाडाविषयीच्या २१५ तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या कसरतीने ही झाडे रात्रभर हटविण्याचे काम युद्धपातळीवर केले आहे. 

काटेपुरम चौकात सर्वात मोठे वडाचे झाड उन्मळून पडले ते काढण्यासाठी तीन तास जवानांना कसरत करावी लागली. यासह इंद्रायणी नगर, शाहूनगर, थेरगाव, सांगवी , कोकणे चौक, वल्लभनगर, भोसरी, वाकड वेणूनगर, चिंचवडगाव रामआळी, भगीरथी सोसायटी, मंगल मूर्ती वाडा, जाधववाडी सावतामाळी मंदिर, चिंचवड पोलिस स्टेशन, श्रीधरनगर दत्तमंदिर, भोईर कॉलनी, सुदर्शन नगर या भागातही झाडे पडली. चिंचवडगाव येथील केशवनगर चंद्रविहार सोसायटी जवळ चारचाकी वाहनावर झाडे पडली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आकुर्डी प्राधिकरण इमारत कॉर्नर जवळील पदपथांवर असलेले झाड मुळासकट कोसळले.  त्याचप्रमाणे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रेल्वेस्टेशनकडे  जाणाऱ्या मार्गावर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडले. ही झाडे दुचाकी व चारचाकीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली. पहाटे पर्यंत झाडे काढण्याची कामे सुरूच होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रथमच हा सामना करावा लागला

प्रथमच शहराला चक्रीवादळाचा सामना करावा लागला. त्यामुळे झाडे पडल्यानंतर पालापाचोळा व  फांद्या कुठे ठेवायच्या हा मोठा प्रश्न अग्निशमन विभागासमोर निर्माण झाला. रस्त्यावर झाडे न ठेवता वाहनाने मोठ्या झाडांची वाहतूक करणे लगेच अवघड होते. काही नागरिकांनी पडलेली झाडे सोसायटी परिसरात ठेवण्यास विरोध केला. तर काही नागरिकांनी प्रत्यक्ष झाडे हटविण्यात मदत केली. 

दुर्लक्षित, कीड लागलेली झाडे मोठ्या प्रमाणात पडली आहेत. आजही दिवसभरात 15 ते 20 कॉल झाडे पडल्याचे आहेत. वाहतूक सुरळीत करणे हा आमचा मुख्य हेतू आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.  वाहने झाडाखाली लाऊ नयेत, असे अग्निशमन दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर हळहळ

सोशल मीडियावरही झाडे पडल्याचे फोटो व व्हिडिओ दिवसभर फिरत होते. याबद्दल नेटकर्यांनी हळहळ व्यक्त केली. फूटपाथमध्ये सिमेंटने झाडांचे गळे आवळणे आता तरी बंद करा अशा संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केल्या. देशी व विदेशी झाडांच्या रोपणा बद्दलही नाराजी व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com