Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
sakal
पिंपरी/निगडी - पावसाच्या रिमझिम सरी, टाळ-मृदंगांचा निनाद, मुखी हरिनाम आणि डोळ्यांत विठुरायाच्या भेटीची आस...अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. ८) उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साह आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी’ या भावनेचा जणू प्रत्ययच भक्ती-शक्ती चौकात येत होता.