
आळंदी - ‘वारकरी संप्रदायाची परंपरा आणि पालखी सोहळा यंदाही साजरा केला जावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याचे रक्षण आणि लॉकडाउननंतरची स्थितीचा विचार केला जाईल. सोहळ्याच्या स्वरूपाबाबत अंतिम निर्णय सरकारशी विचारविनिमय करून घेतला जाईल,’’ अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुखांची मानकरी, वारकरी-फडकरी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. ॲड. ढगे, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, देवव्रत वासकर महाराज, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, डॉ. अभय टिळक, अजित कुलकर्णी, योगेश देसाई, लक्ष्मीकांत देशमुख, माऊली जळगावकर, मारुती कोकाटे, विठ्ठल महाराज वासकर, दादा महाराज शिरवळकर, रामभाऊ चोपदार आदींनी चर्चेत सहभाग झाले.
वारीबाबत सरकारच्या चर्चेची अपेक्षा आहे. लॉकडाउन वाढल्याने चर्चा आणखी लांबली आहे. एकत्रित बैठकीनंतरच वारीचे स्वरूप निश्चित होईल.
- बाळासाहेब आरफळकर, मालक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
वारीच्या स्वरूपाबाबत आता काहीही निश्चित झालेले नाही. सरकारबरोबर चर्चा केल्यानंतर तिचे स्वरूप निश्चित करण्यात येईल.
- ऊर्जितसिंह शितोळे सरकार, मानकरी, ज्ञानेश्वर महाराज पा. सोहळा
राज्यात सध्या अभूतपूर्व परिस्थिती येऊन ठेपली आहे. वारकरी संप्रदायाने यापूर्वीही अनेक संकटांमध्ये समन्वयाच्या भूमिकेतून मार्ग काढले आहेत. याही समस्येतून योग्य तो मार्ग निघेल. वारकऱ्यांनी कोणतीही घाई न करता सरकार आणि संप्रदाय यांच्यातील चर्चेतील तोडग्याची वाट पाहावी.
- राजाभाऊ चोपदार, मानकरी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
लॉकडाउन वाढल्याने या आठवड्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील विश्वस्त आणि मानकरी यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतरच वारीबाबत निर्णय होईल.
- राणू महाराज वासकर, मानकरी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
वारीला अजून सव्वा महिन्याचा अवधी आहे. सरकारच्या चर्चेनंतर त्याला अंतिम स्वरूप येईल. लॉकडाउननंतर वारीच्या चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.
- मारुती महाराज कोकाटे, अध्यक्ष,
संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी संघटना
वारीच्या स्वरूपाचे नियोजन करताना राज्याच्या निरनिराळ्या भागातून येणाऱ्या पालखी सोहळ्यांच्या मार्गांचे सर्वेक्षण करावे लागेल. तसेच आषाढीला पंढरपूरमध्ये किती वारकऱ्यांना प्रवेश देणे शक्य आहे, याचा संयुक्त विचार व्हायला हवा. त्यासाठी सरकार आणि संप्रदाय यांच्यातील चर्चा होणे गरजेचे आहे.
- रामभाऊ चोपदार, मानकरी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
वारकऱ्यांची परंपरा, सरकारची नियमावली, परिस्थितीचे भान या गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. याबाबत सरकारशी चर्चा करून तोडगा काढावा लागेल.
- ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, विश्वस्त, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती, पंढरपूर
परंपरेने सुरू असलेली वारी होणार, यात शंका नाही. मात्र, सध्या कोरोनामुळे तिचे स्वरूप कसे ठेवायचे, याचा निर्णय सरकारशी चर्चा करून ठरविण्यात येईल. सोहळ्याबाबत वारकऱ्यांची आणखी एक बैठक होईल.
- बाळासाहेब चोपदार, मानकरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.