'लॉकडाउन म्हणजे महाआघाडी सरकारला आलेली 'लहर'', कोण म्हणालं पाहा... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

"राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यात महाआघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे," अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

लोणावळा (पुणे) : "राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यात महाआघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे," अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. दरेकर यांनी लोणावळा नगरपरिषदेस गुरुवारी (ता. १६) भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याप्रसंगी आगरी कोळी समाजाचे नेते व आमदार रमेश पाटील, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, कॉंग्रेसचे नेते दत्तात्रेय गवळी, गटनेत्या आरोही तळेगावकर, भाजपचे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, आरपीआयचे कमलशील म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरेकर म्हणाले, की सरकारमध्ये आज विसंवाद आहे, विरोधी पक्षांना विश्वासात घेतले जात नाही. कोविडचे संकट वाढत असून, विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येत आहे. राज्यावर एखादे संकट येते. त्यावेळी सर्व पक्ष मतभेद विसरून एक होतात. राजकारणाच्या पलिकडे जात सर्वांनी एकत्रित येत, त्या संकटावर मात करण्याची गरज असताना राज्य सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोविडच्या संकटात राज्यभर दौरे केले. रुग्णांच्या व्यथा, त्यांना काय कमी पडते जोपर्यंत जवळून पाहता येत नाहीत तोपर्यंत त्याची तिव्रता, त्यातील संवेदना कळत नाही. केवळ मुंबई महापालिकेत केंद्राच्या वतीने देण्यात आलेले चारशे व्हेंटिलेटर पडून आहेत. महापौरांकडून मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगितले जाते, आज राज्यात वैद्यकीय क्षेत्रात ५० टक्के मनुष्यबळाचा अभाव असल्याची टीका दरेकर यांनी केली. लॉकडाउनला विरोध नाही मात्र, त्यातही संवाद, स्पष्टता नाही. लॉकडाउन म्हणजे यांना आलेली 'लहर' असा टोला दरेकर यांनी यावेळी लगावला. 

'मृत झालेले रुग्ण हे व्यवस्थेचे बळी'

एखादा रुग्ण रस्त्यातच दगावतो. रुग्णास व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मिळत नाही, तर नक्की दोष कुणाचा आहे, असा सवाल करत मृत झालेले रुग्ण हे व्यवस्थेचे बळी आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.  व्यवस्था, विसंवाद आणि नियंत्रण नसल्याने जे रुग्ण बळी जात आहेत त्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assembly opposition leader pravin darekar visits lonavla municipal council about corona