हिंजवडीत सहायक पोलिस निरीक्षकालाच मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

हिंजवडी वाहतूक कार्यालयात सहायक पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पिंपरी : हिंजवडी वाहतूक कार्यालयात सहायक पोलिस निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

संतोष शंकर मंजुळकर (वय 41, रा. सावरकर चाळ, लक्ष्मी माता मंदिराजवळ, पाषाणगाव) व उदराम डगलाराम घाची (वय 38, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उमेश नानासाहेब लोंढे (वय 42) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे हिंजवडी वाहतूक विभागात सहायक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहे. गुरुवारी (ता. 24) सकाळी पावणे बाराच्या सुमारास ते कार्यालयात असताना आरोपी तेथे आले. त्यांच्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या कारवाईबाबत आक्षेप घेत मोठमोठ्याने आरडाओरडा करीत फिर्यादीला धक्काबुक्की केली. 

फिर्यादीला हाताने मारहाण करून जमिनीवर ढकलून देत शिवीगाळ व धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant police inspector beaten in Hinjewadi