अजितदादा म्हणजे एक स्पष्टवक्तेपणा...

Atish-Barne-with-Ajit-Pawar
Atish-Barne-with-Ajit-Pawar

अजितदादा.... हे नुसते नाव जरी डोळ्यासमोर आले तरी आख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत की, या नावापुढे पवार हे आडनाव सुद्धा लावायची गरज नाही... एवढे ‘अजितदादा’ नाव प्रसिद्ध आहे...

अजितदादा म्हणजे एक स्पष्टवक्तेपणा... , अजितदादा म्हणजे एक करारी नजर... ‘अजितदादा’ म्हणजे कडक शिस्त व स्वभाव.... आणि अजितदादा म्हणजेच कोणतेही हाती घेतलेले काम होणार असेल तर हो म्हणणारे आणि काम होणार नसेल तर नाही म्हणणारे, दादाच सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात... या बरोबरच आदरणीय अजितदादांच्या स्वभावातील आणखीही एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे... तो म्हणजे ‘भावनाप्रधान असलेले दादा’ आणि हेच मला भावलेले  अजितदादा आहेत...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजितदादांविषयी महाराष्ट्रातील जनतेला दादा म्हणजे एक सडेतोड, एक जहाल मतवादी असणारा नेता म्हणून दादांकडे सर्व जण पाहत होते परंतु मला  भावलेले दादा, मी व्यक्त करत आहे. ‘ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस दादा पत्रकार परिषदमध्ये असताना दादांनी भाऊक होऊन जे भाषण केलं की, ‘मलाही परिवार आहे, मुले आहेत आणि मी देखील एक माणूस आहे मला देखील घरदार आहे, हे बोलत असताना पत्रकार परिषदेमध्ये दादांच्या डोळ्यांमध्ये अचानक पाणी आले आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून दादा हे किती भावनाप्रधान आहेत हे माझ्यासह संपूर्ण देशासह मलाही पहायला मिळाले.’ त्याक्षणापासूनच मी दादांच्या अधिक प्रेमात पडलो गेलो.

महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल उलट सुलट बोलत होते की, हा जहालवादी नेता आहे, परंतु खऱ्या अर्थाने भाऊकपणाचं दर्शन ज्यांच्यामध्ये मला दिसलं तेच माझे दादा खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे मला भाऊक झालेले दिसले आणि म्हणून मला ते भावलेले आहेत आणि तेव्हापासूनच मी जीवात जीव असेपर्यंत एकनिष्ठतेने अजितदादांबरोबर काम करण्याचा निर्णय घेत अाहे. तन-मन-धनाने समाजकार्य करत आहे. हवेली तालुक्याचे तीन वेळा तर भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, भोसरी विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थी ज्यांनी सर्वांगीण विकास केला असे माझे मामा, राजकारणात ज्यांच्या बोटाला धरुन प्रवेश केला असे माझे राजकीय गुरु आदरणीय श्री. विलासशेठ लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला देशात प्रसिद्ध असलेल्या ज्यांच्याशिवाय देशाचे राजकारण होऊच शकत नाहीत असे देशाचे लोकनेते माजी केंद्रीय संरक्षण तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला सामावून घेत महाराष्ट्र राज्याचे आदरणीय विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत मला पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

या मिळालेल्या बहुमानामुळे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा, ना. जयंतराव पाटील, ना. दिलीप वळसे पाटील, ना. दत्तात्रयमामा भरणे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलासशेठ लांडे पाटील व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा. संजोग वाघेरे व सर्व विद्यमान पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी भोसरी विधानसभा मतदार संघासह माझ्या मोशी- चिखलीतील तीनही प्रभागांमध्ये तन-मन-धनाने विविध प्रकारे सामाजिक कार्य करत आहे. 

कोरोना काळात पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना किरणा, अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क, कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप करत आहे. प्रभागातील नागरिकांसह रंजल्यागांजल्यांची सेवा करत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अतिश आनंदा बारणे उपाध्यक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा या पदावर काम करत असताना, एक आदर्श नेता यांच्याबद्दल बोलावे लागेल की ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले’ जे बोलतो तेच करणारा नेता, मनामध्ये जे आहे तेच ओठावर असणारा नेता, समाजामध्ये काम करत असताना एक अतिशय सडेतोड आणि खरं बोलणारा नेता म्हणजे माझे अजितदादा. 

कोरोना व्हायरस म्हणजेच ‘कोविड-१९’ चा प्रादुर्भाव ज्यावेळेस झाला तेव्हा दादांच्या आदेशानुसार मी पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या विमुक्त  समाजातील लोकांना अन्नधान्य वाटपाचे काम केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय दादांचाच १०० टक्के मोलाचा वाटा आहे. ज्यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर एक आदर्श शहर म्हणून बनलं ते आदरणीय दादांमुळेच. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये औद्योगिक वसाहत आणि मोठमोठे उद्योग क्षेत्र उभारणीमध्ये आदरणीय दादा यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जडणघडणीमध्ये आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्येही आदरणीय अजितदादांचाच मोलाचा वाटा आहे.

मला आठवतंय की, दादा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये बोलत असताना समोरच्या श्रोत्यांना जरा विरंगुळा हवा म्हणून दादा मधे मधे विनोदी शब्द वापरतात आणि तेच आपल्याला भावते. उदाहरणार्थ, सासवडच्या सभेमध्ये दादा बोलताना म्हणाले की, ‘आता तो कसा आमदार होतो तेच बघतो.’ अशा आशयाच्या भाषणांनी दादांनी अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची व जनतेची मते, मने जिंकली आहेत. या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पैलूमुळेही अजितदादा मला मनापासून खऱ्या अर्थाने भावले आहेत. अजितदादांबद्दल सांगत असताना दादांच्या भाऊकपणाचं दर्शन झालेला आणखीन एक प्रसंग म्हणजेच कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेले अनेक वर्ष चालू असलेली महाराष्ट्राची परंपरा म्हणजे आषाढी वारी खंडीत झाली. तिर्थक्षेत्र आळंदी व देहू येथून जाणाऱ्या माउली व तुकोबा यांचे पालखी सोहळे पंढरपूरला जात असत.

परंतु यावर्षी कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला आणि त्यावर दादांनी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने माझ्या व सर्व वारकरी जनतेच्या ह्रदयाला भिडला होता. तो म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका कसल्याही पद्धतीत मी पंढरपूरला पाठवणार म्हणजे पाठवणारच. पर्यायाने त्या हेलिकॉप्टरने देखील पाठवण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. असेही वारकऱ्यांच्या भावना सांभाळणारे दादा माझ्या मनाला भावले आहेत. 

आणखी एक प्रसंग सांगायचा म्हणजे, दरवर्षी पाडव्याला सर्वजण पवारसाहेब व अजितदादांना भेटण्यासाठी बारामती येथे जात असतात. मी देखील २०११ मध्ये गोविंदबाग येथे गेलो असता दादांनी अतिशय प्रेमाने व आपुलकीने माझी चौकशी केली. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने दादांबद्दल माझ्या मनात निस्सीम प्रेमभावना निर्माण झाली. व प्रेमळ अशा स्वभावाचे दादाही मला भावले आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com