कंपनीच्या प्लॅन्टहेडवर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू; वडगाव पोलिस म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

मुथुय्या यांच्यावर गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी रस्त्यावर वडगाव जवळील विशाल लॉन्ससमोर मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी हॉकी स्टिकने हल्ला केला होता.

वडगाव मावळ (पुणे) : तळेगाव एमआयडीसीमधील युएमडब्ल्यू डॉन्गशिन कंपनीचे प्लॅन्टहेड मुथुय्या सुबय्या कुडेदरा (वय ५७, रा. टाटा हाउसिंग सोसायटी, वडगाव मावळ, मूळ रा. बंगलोर, कर्नाटक) यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा व हल्ल्याच्या कारणांचा शोध सुरू असल्याची माहिती वडगावचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली.        

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुथुय्या यांच्यावर गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी रस्त्यावर वडगाव जवळील विशाल लॉन्ससमोर मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी हॉकी स्टिकने हल्ला केला होता. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

मुथुय्या हे सायंकाळी कंपनीतून घरी चालले असताना विशाल लॉन्ससमोरील गतिरोधकाजवळ त्यांच्या मोटारीला मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. काय झाले हे पाहण्यासाठी ते गाडी थांबवून बाहेर येत असताना दोन मोटारसायकलवरील चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पायावर हॉकी स्टिकने हल्ला केला. पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. हल्लेखोर अद्याप फरार असून, पोलिस हल्लेखोरांचा व हल्ल्याच्या कारणाचा शोध घेत असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on umw umw dongshin planthead muthuya subaya kudedara at vadgaon