किरकोळ कारणावरून त्यानं कोयता काढला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करीत कोयत्याने वार केले.

पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करीत कोयत्याने वार केले. त्यानंतर जमा झालेल्या लोकांच्या दिशेने कोयता भिरकावून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुषार सुरेश भंडारी (रा. गणेश हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सचिन हनुमंत वाघमारे (वय 22, रा. गणेश हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. 14) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी ताराबाई चौक येथे थांबलेले असताना त्यांना पाहून भंडारी तेथे थांबला. दरम्यान, फिर्यादीने 'काय रे तुषऱ्या', असा त्याला आवाज दिल्याचा राग आल्याने तुषारने फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, त्याठिकाणी आलेल्या तुषारच्या दोन साथीदारांपैकी एकाने फिर्यादीच्या डोक्‍यात कोयता मारला. त्यानंतर तुषारने तोच कोयता घेऊन त्याठिकणी जमा झालेल्या लोकांच्या दिशेने भिरकावून त्यांच्या अंगावर धावून गेला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on youth at chikhali

Tags
टॉपिकस