एटीएम मशीन फोडण्यासाठी आले अन् ग्रामस्थांच्या तावडीत सापडले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

कार्ला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावला.

लोणावळा (ता. मावळ) : कार्ला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावला. चोरट्यांचा पाठलाग करत एक ग्रामस्थांच्या तावडीत सापडला. त्यानुसार पोलिसांनी सराईत चोरटा तिलकसिंग त्रिलोकसिंग टाक (वय 39, रा. हडपसर) यास अटक केली. 

तरुणीनं लग्नास नकार दिल्याने तरुणानं उचललं हे मोठं पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 6) पहाटे कार्ला येथे वाहनातून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्राचे सुरक्षारक्षक अश्‍पाक अहमद शेख (वय 37) यांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. शेख यांनी जीव वाचवत तिथून सुटका करत गावाच्या दिशेने धाव घेतली. एटीएम फोडण्याकरिता आलेल्या चार जणांपैकी दोघे बोलेरो गाडीच्या जवळ उभे होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच कार्ला ग्रामसुरक्षा दलाचे अनिकेत पाटील, पवन म्हाळस्कर यांच्यासह ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निरंजन रनवरे, हवालदार आशिष काळे, नाईक प्रणय उकिर्डे आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच दोघा चोरट्यांनी वाहनासह, तर दोघे जण झाडाझुडपात पसार झाले. ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी पाठलाग करत तिलकसिंग यास ताब्यात घेतले. तर सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या पथकाने कामशेत येथून चोरट्यांचे वाहन ताब्यात घेतले. मात्र चोरटे पसार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attempt to blow up atm machine at karla lonavala