धक्कादायक! 'मोटारीवर लघुशंका करू नका' असे सांगणाऱ्या सुरक्षारक्षकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

मंगळवारी (ता.17) दुपारी सव्वाचारच्या सुमारास आरोपी कदम हा फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीचे मालक तिरमल यांच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करीत होता. त्यास वायफळकर यांनी येथे लघुशंका करू नको, असे सांगितले.

पिंपरी : मोटारीवर लघुशंका करू नका असे सांगणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील सेक्टर दहा येथे घडली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भगवान शंकर वायफळकर (वय 41, रा. दत्तनगर, चिंचवड) असे या घटनेत भाजलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र बाळू कदम (वय 31, रा. बालाजीनगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी वायफळकर हे भोसरी एमआयडीसीतील एस. व्ही. एटरप्रायझेस या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मंगळवारी (ता.17) दुपारी सव्वाचारच्या सुमारास आरोपी कदम हा फिर्यादी काम करीत असलेल्या कंपनीचे मालक तिरमल यांच्या बीएमडब्ल्यू मोटारीवर लघुशंका करीत होता. त्यास वायफळकर यांनी येथे लघुशंका करू नको, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी कदम याने फिर्यादी वायफळकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. या घटनेत वायफळकर हे गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to burn alive a security guard who says don't urinate on a car in pimpri