भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अटकेत

पिंपरी - भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) विनयभंग (Molesting) करणाऱ्या रिक्षाचालकाला (Rickshaw Driver) अखेर हिंजवडी पोलिसांनी अटक (Arrested) केली. गुन्हा (Crime) केल्यानंतर ओळख पटू नये यासाठी आरोपीने रिक्षातही बदल केल्याचे समोर आले.

सचिन देविदास शेंडगे (वय ३३, रा. दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २२) दुपारी तीनच्या सुमारास बारावर्षीय पीडित मुलगी क्लासवरून घरी जात होती. बावधन येथील एमएलडी चौक येथून जात असताना समोरून अचानक एक रिक्षावाला तिच्या जवळ आला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीकडे पाहून अश्लील वर्तन करू लागला. घाबरलेली मुलगी तेथून पळत निघाली. घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनास्थळासह त्यामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

दरम्यान, दापोडी येथील एका रिक्षाबाबत संशय आला. मात्र, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व दापोडीतील रिक्षात बदल असल्याचे दिसून आले. कसून तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्यानंतर रिक्षात बदल केल्याचे समोर आले. त्याने रिक्षाच्या काचेवर रेडियमने काही चित्र व मजकूर लिहिला होता. हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला वाकडमधील मानकर चौक येथून ताब्यात घेतले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Autorickshaw Driver Arrested For Molesting Minor Girl Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top