हरित शाश्वत विकासाबद्दल महापालिकेला पुरस्कार

हरित शाश्वत विकासाबद्दल महापालिकेला पुरस्कार

पिंपरी, ता.९ : हरित शाश्वत विकासामधील महत्वपूर्ण कामगिरीसाठी आयजीबीसी या संस्थेकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘प्लॅटिनम एक्झिस्टिंग ग्रीन सिटीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नगर विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या हस्ते महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या प्रतिष्ठित ग्रीन सिटी रेटिंग प्रणाली अंतर्गत पिंपरी चिंचवडला राज्यातील दुसरे हरित शहर म्हणून मान्यता देण्यात आली. सीआयआय, आयजीबीसीद्वारे ग्रीन सिटीज ‘प्लॅटिनम’ फलकही पालिकेला प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास पीएमपीएमएलचे संजय कोलते, नगर रचनाचे संचालक अविनाश पाटील, महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, स्मार्ट सिटीचे किरणराज यादव, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, हरदिपसिंह बन्सल, उपअभियंता सोहन निकम, आयजीबिसी अध्यक्षा डॉ. पूर्वा केसकर, सहअध्यक्ष ऋषिकेश मांजरेकर, जे.पी. श्रॉफ उपस्थित होते.
सत्‍काराला उत्तर देताना आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडची हरित शहर सिटी म्हणून ओळख होणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. शाश्वत पद्धतींचा प्रचार, कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि हरित आच्छादन वाढवणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जलस्रोत पुनर्संचयित केल्याने आमची स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी शहराच्या दिशेने वाटचाल चालूच राहील.’’
महापालिकेसाठी या संपूर्ण प्रकल्‍पाचे सल्लागार म्हणून व्हीके इव्हार्नमेंटल व स्प्रौट यांनी काम पाहिले. या दोन्ही सल्लागारांच्यावतीने प्रणती श्रॉफ, तनया पाटील, अमोल उंबरजे, सुवर्णा सुरवसे यांचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com