रिक्षाचालकांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करणार - बाबा कांबळे 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

सरकारने रिक्षा चालकाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. 

पिंपरी - कोरोनामुळे दिवसेंदिवस रिक्षाचालकांचे प्रश्‍न अत्यंत गंभीर होत असून व्यवसाय नसल्यामुळे त्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. मात्र सरकारने रिक्षा चालकाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथे रिक्षा चालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला बाबासाहेब ढवळे, विजय ढगारे, सचिन कदम, संतोष पवार, संतोष उबाळे, सचिन कांबळे, नीलेश वाघुले, संतोष मस्के, अजय साळवे, नासिर बिराजदार, वाजीद शेख, प्रवीण ठोके, विकी चव्हाण उपस्थित होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कांबळे म्हणाले, ""प्रत्येक रिक्षा स्टॅंडवर हे आंदोलन होणार असून सर्व रिक्षा चालकांनी रिक्षा स्टॅन्ड वर एकत्र येऊन आणि आपल्या रिक्षा समोर उभे राहून बोंबाबोंब करायचे आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक रिक्षा चालकास 10 हजार रुपये द्यावे. बिकट परिस्थितीमध्ये रिक्षा चालकांना सरकारच्यावतीने आर्थिक मदत होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने वीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले परंतु रिक्षा टॅक्‍सी आणि वाहकांना कोणत्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफी केले तसेच रिक्षाचालकांच्या हप्ते व कर्ज माफ करावी. कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून तगादा लागला जात आहे. कर्जमाफी ऐवजी वसुली केली जात आहे. याबाबत कारवाई करावी रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baba Kamble will agitate for the question of rickshaw driver