esakal | भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती

बोलून बातमी शोधा

भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती}
  • ऑनलाइन बुकिंगही मिळेना 
भोसरीतील बॅडमिंटन हॉलची दुरवस्था; वूडन कोर्ट खराब झाल्याने खेळताना दुखापती
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोसरी (पिंपरी-चिंचवड) : ‘‘इंद्रायणीनगरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बॅडमिंटन हॅालमध्ये अडीच वर्षांपूर्वी सरावास जात होतो. मात्र, वूडन कोर्टची दुरवस्था झाल्याने बऱ्याच वेळा खेळताना पायाला दुखापत झाली. पावसाचे पाणी आतमध्ये येऊन कोर्टची दुरवस्था झाली आहे. तसेच, सध्या संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टसाठी ऑनलाइन बुकिंगही काही वेळेस मिळत नाही. त्यामुळे सराव करता येत नाही,’’ अशी व्यथा बॅडमिंटन खेळाडू चेतन काशीद यांनी मांडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परिसरातील बॅडमिंटन खेळाडूंची सोय व्हावी, यासाठी महापालिकेने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बॅडमिंटन हॉल बांधला. यामुळे स्थानिक खेळाडूंची चांगली सोय झाली होती. मात्र, महापालिकेने या हॅालच्या मेंटेनन्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली. त्याची पाहणी महापालिकेचे स्वीकृत नगरसदस्य संजय वाबळे यांनी क्रीडा विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांसह केली. त्यानुसार वाबळे यांनी पालिका आयुक्तांकडे दुरुस्तीची मागणी केली आहे. 

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

इंद्रायणीनगर परिसरातील खेळाडू संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॅालवर सरावासाठी अवलंबून असतात. मात्र, या क्रीडा संकुलात पिंपरी-चिंचवड शहरातून खेळाडू येत असल्यामुळे ऑनलाइन बुकिंग सुरुवातीच्या पाच-दहा मिनिटातच संपते. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सराव करता येत नाही. या हॅालची दुरुस्ती केल्यास स्थानिक खेळाडूंची सोय होणार आहे. ‘क’ प्रभागाच्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, की क्रीडा विभागाद्वारे बॅडमिंटन हॅालच्या दुरुस्तीचे पत्र मिळाले आहे. लवकरच याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थिती काय? 

  • वूडन कोर्ट, स्वच्छतागृहाची दुरवस्था 
  • सिमाभिंतीची पडझड 
  • निखळलेल्या खिडक्यांतून कबुतरांचा वावर. 
  • एक्झॅास्ट पंख्यांची दुरवस्था. 
  • पिण्याचे पाणी नाही 
  • प्रवेशद्वार गायब 
  • पावसाळ्यात छत गळते- दिव्यांगासाठीचा रॅम्प मोडकळीस 
  • इमारतीची दुरवस्था 

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बॅडमिंटन हॅालमधील जुना वूडन कोर्ट बदलून आंतरराष्ट्रीय दर्जाची फ्लोरिंग मॅट टाकावी. त्याचप्रमाणे हॅाल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. बॅडमिंटन हॅाल व परिसरातील विविध खेळांच्या मैदानांची दुरुस्ती तातडीने न केल्यास खेळाडूंसमवेत पालिकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल. 
- संजय वाबळे, स्वीकृत नगगरसदस्य, महापालिका 

बॅडमिंटन हॅालच्या दुरुस्तीसाठी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे येथील वूडन कोर्ट बदलून आधुनिक पद्धतीची मॅट टाकण्यासाठी क्रीडा स्थापत्य विभागाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. 
- अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षिका, महापालिका