वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

वाकडमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पिस्तूल ओढून धक्काबुक्की

पिंपरी : शासकीय अधिकारी जागेची मोजणी करत असताना, एकाने शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच, बंदोबस्तावरील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पिस्तूलाची दोरी ओढून त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. ही घटना वाकड येथे घडली.

विजय निवृत्ती वाघमारे (वय 60, रा. वाकड गावठाण) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार दीपक गायकवाड यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड येथील सखाराम वाघमारे अंडरपासजवळ एका जमिनीची मोजणी करण्यासाठी बंदोबस्त लावण्याबाबत मंडल अधिकाऱ्यांनी वाकड पोलिसांना अर्ज दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी जागेची मोजणी सुरू असताना, आरोपी वाघमारे याने मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देखील उपस्थित होते. ते बंदोबस्तावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. त्यावेळी आरोपीने वरिष्ठ निरीक्षक यांना देखील शिवीगाळ केली. तसेच, मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आला. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक यांच्या कमरेला असलेल्या पिस्तूलाची  दोरी ओढून आरडाओरडा करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com