esakal | Pimpri : बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील श्वानांची संख्या वाढू नये, म्हणून दर वर्षी हजारो भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात असल्याचा दावा महापालिका (corporation) करत असताना दुसरीकडे दिवसागणिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास समोर येत आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बजाज फाउंडेशनला शस्त्रक्रियेचा जबाबदारी दिली आहे. परिणामी वार्षिक आठ कोटीच्या लूटमारीला लगाम घातला आहे.

शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. महापालिकेने मोकाट कुत्री या विषयाकडे डोळेझाक केली. त्यामुळेच मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून कुत्र्यांवर निर्बिजीकरण केले जाते; परंतु त्यांची वाढती संख्या नियंत्रणात आली नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. गल्लीबोळात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे शहरवासीयांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या सुमारास त्यांचा उपद्रव अधिकच वाढतो. भटक्या कुत्र्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

हेही वाचा: जलपूजन ऐनवेळी रद्द करण्याची पिंपरी-चिंचवड महापौरांवर नामुष्की

वर्षापासून प्रस्ताव पडून

कॅनॉईन केअर कंट्रोल (सीसीसी)चे बजाज फौंडेशन भारतीय जीव जंतू कल्याण मंडळ (AWBI)च्या निकषानुसार मान्यता प्राप्त आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२०मध्ये त्या संस्थेने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. पण त्यावर वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी चर्चा केली नाही. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा चकरा मारल्या. मात्र टक्केवारीत अडकलेल्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली. याबाबतची माहिती आयुक्त पाटील यांना समजताच त्यांनी संबंधित प्रस्तावाची फाइल मागून घेतली. फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या प्रस्तावावर सवित्तर चर्चा केल्यावर त्यांच्या प्रकल्पाला भेट देण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे दिली.

आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवल्याने आता फौंडेशन मोफत कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणार आहे. फौंडेशनला इमारत व लागणारे पिंजरे उपलब्ध करून दिल्यास मंडळाच्या निकषानुसार दररोज मोकाट कुत्र्यांच्या मोफत २०० शस्त्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने पार पडतील. शस्त्रक्रियेनंतर पुढील पाच दिवस कुत्र्यांना लागणारा खर्चही फौंडेशन करणार आहेत. येत्या दोन महिन्यात दोन प्रभागात एक श्वान नियंत्रण व देखभाल केंद्र उभारण्याचे आयुक्तांनी निश्चित केले आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये १९३ नवीन रुग्ण

चार संस्थांना होते कंत्राट

शहरात ९० मोकाट श्‍वानांची संख्या आहे. त्यांच्याबाबत नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या सतत तक्रारी येतात. यावर उपाय म्हणून कुत्र्यांचे निर्बिजीकरणासाठी दरवर्षी आठ कोटी रुपयांचे चार संस्थांना कंत्राट दिले जाते. तरीही नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. महापालिका सर्वसाधारण बैठकीतही अनेकवेळा आरोप प्रत्यारोप झाले. निर्बिजीकरणाच्या नावावर पशुवैद्यकीय विभाग वर्षाला पालिकेच्या तिजोरीवर आठ कोटीला चा खर्च करून लूटमार करीत असल्याच्या तक्रारी पालिका आयुक्त पाटील यांच्याकडे आल्या होत्या. त्यांच्या तपासाअंती सत्य पडताळणीनंतर तुर्तास बजाज फाउंडेशनला मान्यता दिली आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिली.

loading image
go to top