पर्यटनाला जाताना सावधानता बाळगा नाहीतर होणार पोलीस कारवाई

फेसाळणारे धबधबे आणि पावसामुळे चोहिकडे निसर्गाचे सौंदर्य याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
राज्यातील पर्यटन कात टाकणार
राज्यातील पर्यटन कात टाकणार pune

पिंपरी : फेसाळणारे धबधबे आणि पावसामुळे चोहिकडे निसर्गाचे सौंदर्य याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. त्यामुळे ते पाहण्यासाठी, गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्यासाठी पर्यटक आसुसलेले आहेत. परंतु, पर्यटनाला बंदी असल्याने कारवाईच्या भीतीने त्यांची घुसमट होवू लागली आहे. प्रत्येक हौशी पर्यटक घरात बसून वैतागला आहे. लहान मुले आई-वडिलांकडे घराबाहेर पडण्यासाठी हट्ट करत आहेत. ज्येष्ठही समूहाने भटकंतीसाठी बाहेर पडत होते, तेही बंद झाले आहे. (Pune News)

सध्या १४४ कलमानुसार संचारबंदी महाराष्ट्रभर लागू आहे. त्यानुसार पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. बऱ्याच जणांची विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट केली जाते. तसेच अद्यापही सर्वांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर फिरताना आरटीपीसीआर गरजेचे आहे. सध्या लेह-लडाख, शिमला, कुलू-मनाली, सेव्हन सिस्टर या ठिकाणी पर्यटन खुले आहे. परंतु, महाराष्ट्रात पर्यटन स्थळे बंद आहेत. सध्या मावळ, मुळशी व लोणावळा, लवासा, पानशेत, सिंहगड या भागात पर्यटक खुलेआम फिरत आहेत. नियमांचे उल्लंघन करून दंडही भरण्याची तयारी दर्शवित आहेत. कारण घरात बसून बसून ते इतके वैतागले आहेत.

राज्यातील पर्यटन कात टाकणार
खडकवासला धरणातील पाणी होतंय नितळ

लसीकरण केल्यामुळे काही हौशी पर्यटक मनसोक्त फिरण्यासाठी बाहेर पडतात. परंतु, लसीकरण सर्वांचे झाले नसल्यामुळे तो देखील धोका संभवत आहे. ज्येष्ठ नागरिकांचीही अशीच स्थिती आहे. परंतु, यातील बऱ्याच जणांचा एकच डोस पूर्ण झाला आहे. तर काहींनी दोन डोस पूर्ण घेतलेले आहेत. अद्याप लहान मुलांचे लसीकरण न झाल्याने बाहेर फिरणे घातक आहे.

सध्या सर्व ठिकाणी १८८ ची कारवाई सुरु आहे. पर्यटनाच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड, तर नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो. नागरिकांना फिरण्यासाठी बंदी आहे. संसर्गाचा धोका टळलेला नाही हे लक्षात घ्यावे.

- विवेक मुंगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

राज्यातील पर्यटन कात टाकणार
शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मांचा फोटो

मुले घरात बसून कंटाळली आहेत. रोज कुठेतरी घेऊन चल असा हट्ट करतात. उद्यानात मुलांचे मन रमते पण गर्दी होते. वॉटर पार्क, जलतरण तलाव अशा ठिकाणी मुलांना जायला आवडते. फार दूर नाही पण जवळच्या ठिकाणीही मुले जाण्यास आसुसलेली आहेत. बाहेरचे खाणे बंद केले आहे. गेम्स झोन पण बंद आहेत. त्यामुळे मन रमवण्यासाठी पालकांची कसरत आहे.

-नेत्रा शिंदे, पालक, चिंचवड

नागरिक घरात बसून हैराण झाले आहेत. बऱ्याच जणांचे मानसिक स्वास्थ्य खालावले आहे. अनेकांची घुसमट होत आहे. काहींना कारवाईची भीतीही राहिलेली नाही. परंतु,पर्यटनस्थळी काळजी घेऊन फिरणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी रुग्णसंख्या घटल्याने जाण्याची संधी आहे.

-यज्ञेश महाजन, सारथी टुरिझम, निगडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com