दोन मुली झाल्याने विवाहितेला मारहाण; मानसिक छळ करीत ठेवले उपाशी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासह दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला.

पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासह दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सासू निर्मला विजय ओव्हाळ (वय 55), सासरा विजय नामदेव ओव्हाळ (वय 60), पती सुशील ओव्हाळ (वय 35), दीर सुजीत ओव्हाळ (वय 33), जाऊ वैशाली ओव्हाळ (वय 32), चुलत नणंद रितू प्रकाश कांबळे (वय 31, सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय; सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

फिर्यादी सासरी नांदत असताना तुझ्या आई-वडिलांनी नीट लग्न लावून दिले नाही, पतीवर असलेले कर्ज फेडण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये यासह दोन्ही मुली झाल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना वेळोवेळी शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच उपाशी ठेवण्यासह घालून पाडून बोलत फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beating a married woman for having two daughters in thergaon