esakal | आतापर्यंत तुम्ही अनेक मास्क बघितले, आज हा सोन्याचा मास्क अन् तो परिधान करणारा माणूस पाहा
sakal

बोलून बातमी शोधा

आतापर्यंत तुम्ही अनेक मास्क बघितले, आज हा सोन्याचा मास्क अन् तो परिधान करणारा माणूस पाहा

- भोसरीतील बांधकाम व्यावसायिकाचा पराक्रम 
- अंगावर तब्बल शंभर तोळे सोनं

आतापर्यंत तुम्ही अनेक मास्क बघितले, आज हा सोन्याचा मास्क अन् तो परिधान करणारा माणूस पाहा

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

पिंपरी : शिक्षण आठवी. बालपण झोपडपट्टीतलं. ख्याती बांधकाम व्यावसायिकाची. आजही भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टीनजीकच्या गंधर्वनगरीत त्याचं घर आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि गोल्डन मॅन असा इतिहासच हळूहळू रचला जात आहे. त्यात आता सोन्याचा मास्क तयार करून शंकर कुऱ्हाडे या आणखी एका 'गोल्डन मास्क मॅन'ची भर पडली आहे. हौसेला मोल नाही हेच खरं. तब्बल 2 लाख 90 हजार रुपयांचा साडेपाच तोळ्याचा मास्क घालून ते फिरत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोल्हापूरला चांदीचा मास्क एकाने बनविला त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर कुऱ्हाडे यांच्या डोक्‍यात सोन्याच्या मास्कची कल्पना आली. अवघ्या आठ दिवसांत त्यांनी तो तयार केला. बुधवारी (ता.1) त्यांनी तो मास्क तयार करून परिधान केला देखील. मग काय शहरात चर्चेला उधाण आलं. हातांच्या पाचही बोटात 45 तोळ्याच्या अंगठ्या आहेत. गळ्यात 40 किलोचा सोन्याचा गोफ आहे. असे मिळून तब्बल अंगावर शंभर तोळ्यांच्यावर सोने आहे. सध्या त्याचं वय 49 आहे. आमदार महेश लांडगे यांचे ते निकटवर्ती कार्यकर्ते आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुऱ्हाडे म्हणाले, "आयुष्य झोपडपट्टीतच गेलं आहे. मला कोणतंही राजकारण करायचं नाही. मी समाजसेवा करण्यातच धन्यता मानतो. भोसरीत नागरिकांना लॉकडाउनमध्ये अन्नधान्याचे मोफत वाटप केले. होमिओपॅथीची औषधे वाटली. येथून पुढेही समाजकार्य सुरुच ठेवणार आहे. मला देखील संसर्गाची भीती आहे. मात्र, घरात बसून पर्याय नाही. सोन्याच्या मास्कलाही श्‍वास घेण्यासाठी छिद्र केली आहेत. साध्या कापडी मास्कनेही संसर्ग रोखला जातो की नाही हे ठोस माहिती नाही."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिले गोल्डन मॅन पुण्यातील दिवंगत आमदार रमेश वांजळे हे पैलवान होते. राजकारणात आल्यानंतर सोन्याची हौस त्यांनी पूर्ण केली. वांजळे यांचा रुबाबही निराळाच होता. त्यानंतर शहरात गोल्डन मॅनची क्रेझच निर्माण झाली. राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांनी सोन्याचा शर्ट शिवला. त्यांच्याही शर्टला सोन्याची बटणे, गळ्यात चेन, कडे असा पेहराव होता. मात्र, महागडा सोन्याचा शर्ट घालणाऱ्या गोल्डन मॅनचाही दुर्दैवी अंत झाला. गोल्डन मॅन व उद्योगपती सम्राट मोझे यांची ही ख्याती मोठी होती.