
भोसरी : भोसरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवात मनोरंजनाबरोबरच वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी आणि संतांचे विचार घराघरांत पोचविण्यासाठी चक्रीभजन घेतले जाते. या चक्रीभजनाच्या माध्यमातून शास्त्रीय गायन आणि वादनाच्या स्पर्धा घेत वारकरी परंपरा वृद्धिंगत केली जात आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपासूनची ही परंपरा भोसरीकर आजही जपत वारकरी संप्रदायाला उजाळा देत आहे.