लोणावळा : पर्यटकांचं आकर्षण असलेल्या भुशी धरणाबद्दल ही महत्त्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

लोणावळा परिसरात मोसमी पावसाने शनिवारी (ता. ४) चांगलाच जोर धरला असून, पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण तुडुंब भरले आहे.

लोणावळा (पुणे) : लोणावळा परिसरात मोसमी पावसाने शनिवारी (ता. ४) चांगलाच जोर धरला असून, पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र असलेले भुशी धरण तुडुंब भरले आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने शनिवारी सायंकाळी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

लोणावळ्यात आतापर्यंत ६४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची साठवण क्षमता ०.५० दशलक्ष घनमिटर असून, गेल्या वर्षी १ जुलै रोजी भुशी धरण भरले होते. मॉन्सून लांबला असताना महिनाभराच्या विश्रांतीनंतर धरण भरले आहे मात्र, यंदा कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटकांना वर्षाविहाराचा आनंद लुटता येणार नाही.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंगी, तिकोना, कोराई आधी गडकोट, कार्ला, भाजे लेण्यासह परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकासाठी यापूर्वीच बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या मावळात पाऊस बहरत आहे. लोणावळा, खंडाळ्यासह मावळात वर्षाविहार करण्यासाठी पर्यटकाची नेहमीच गर्दी होत असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र राहीले आहे. पावसात धरणाच्या सांडव्यावर भिजण्यासाठी तरुण,तरुणीसह आबालवृद्धाची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे याठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नागरिकाची सुरक्षितता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भुशी धरण पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushi dam overflow continuous rains in lonavla area