pune ring road
sakal
पिंपरी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) वर्ग केलेली ११७ गावे पुन्हा एकदा ‘पीएमआरडीए’कडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) सोपवण्यात येणार आहेत. या गावांतील नागरी विकासातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर झाले असून, एकसंध आणि एकात्मिक पद्धतीने संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.