

Two Firms Partner for Hinjewadi Metro Feeder Service; 20 Smart Buses on 14 Routes
sakal
पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर प्रवाशांना मेट्रो स्टेशनवरून ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ने (पीआयटीसीएमआरएल) दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. पहिल्या टप्प्यात २० बसद्वारे १४ मार्गांवर ॲप आधारित ‘बस सेवा’ सुरू करण्यात येणार आहे.