वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ चक्क तुरुंगात!

मंगेश पांडे
Wednesday, 9 December 2020

वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री रस्त्यावर एकत्र जमून कोयता, तलवारीने केक कापून धिंगाणा घातला जातो. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्यास बर्थ डे बॉयचा वाढदिवस कुटुंबीयांसमवेत अथवा मित्रांसह साजरा न होता थेट तुरुंगात साजरा होत आहे. यामुळे शुभेच्छा मिळणे तर दूरच पोलिसांचा दंडुका खाण्याची वेळ येत आहे.

पिंपरी - वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री रस्त्यावर एकत्र जमून कोयता, तलवारीने केक कापून धिंगाणा घातला जातो. मात्र, पोलिसांनी कारवाई केल्यास बर्थ डे बॉयचा वाढदिवस कुटुंबीयांसमवेत अथवा मित्रांसह साजरा न होता थेट तुरुंगात साजरा होत आहे. यामुळे शुभेच्छा मिळणे तर दूरच पोलिसांचा दंडुका खाण्याची वेळ येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढदिवस म्हणजे शुभचिंतन करण्याचा दिवस असतो. कुटुंबीयांसह अथवा मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र, आता वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच बदलली आहे. मध्यरात्री एकत्र जमून कोयता, तलवार यासारख्या हत्याराने रस्त्यावर केक कापला जातो. कापलेला केक खाण्याऐवजी बर्थ डे बॉयसह एकमेकांच्या तोंडाला फासला जातो. यातून वादाच्या घटना घडतात. आतषबाजी, घोषणाबाजी करीत मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जातो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

डॉक्टरांकडूनही फिटनेसला प्राधान्य; ताणतणाव घालवण्यासाठी कसा व्यायाम करतात जाणून घ्या

मात्र, मद्याच्या नशेत असलेल्या टोळक्‍यांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. शहरातही असे प्रकार घडत आहेत. शनिवारी (ता. ५) रात्री दापोडी येथे सोहेल शेख या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचा मित्र समीर सियाज बागसिराज याने आणलेला केक कोयत्याने कापण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावर एका माजी आमदार पुत्राचा वाढदिवस हत्याराने केक कापून साजरा केला होता. या प्रकरणाची जोरदार चर्चाही झाली होती. 

देहू ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर; उपमुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

बेकायदा हत्यार बाळगून केक कापणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून दहशत निर्माण केल्यास गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात जाग्यावर जामीन होत नाही. आरोपींना न्यायालयात हजर केल्यास कारागृहात रवानगी केली जाते. 

हत्याराने केक कापून दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा तरुणांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday celebrations in jail