

Internal Lobbying Heats Up in BJP for Pimpri-Chinchwad Mayor Position
Sakal
-जयंत जाधव
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आल्यानंतर आता महापौरपद कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापौरपद खेचण्यासाठी भाजपचे आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप व समन्वयक आमदार अमित गोरखे या तिन्ही गटांत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तीन विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी तीन नावे बंद पाकिटात पाठविण्याच्या सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे आता तीन स्थानिक कारभाऱ्यांपैकी कोणत्या गटाला ही संधी मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.