भाजप नगरसेविकेसह दहा जणांना न्यायालयीन कोठडी

एक दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
भाजप नगरसेविकेसह दहा जणांना न्यायालयीन कोठडी
भाजप नगरसेविकेसह दहा जणांना न्यायालयीन कोठडीsakal
Updated on

पिंपरी : अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर व आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह दहा जणांना पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (ता. ९) अटक केली होती. त्यांची एक दिवसाची पोलिस कोठडी संपल्यानंतर शनिवारी (ता. ११) न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नगरसेविका आशा धायगुडे - शेंडगे, पूजा भांडारी, शीतल पिसाळ, गौरी राजपाल, आशा जैस्वाल, शीतल जाधव, जयश्री सनके, संध्या गवळी, स्वप्नील आहेर, संजय पवार (सर्व रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद रामकृष्ण निकम (रा. सुदर्शननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. गणेशोत्सव सुरू होत असल्याने कासारवाडीतील खोदकाम करू नये, अशी विनंती शेंडगे यांनी अधिकारी व ठेकेदाराला केली. तरीही कामे सुरूच ठेवल्याने शेंडगे यांच्यासह काही महिलांनी गुरुवारी (ता. ९) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी चिंचवड महापालिका भवनात आंदोलन केले.

भाजप नगरसेविकेसह दहा जणांना न्यायालयीन कोठडी
उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय निश्चित - नड्डा

शासकीय अधिकारी अशोक भालकर यांच्या कार्यालयात गेले. त्यांच्या खुर्चीवर फुले व काळी शाई टाकली. तसेच त्यांच्या टेबलावर धिक्कार असो असे लिहिले. तसेच आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदा जमाव जमवून आयुक्तांना दालनाबाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षारक्षक व पोलिसांना धक्काबुक्की केली. आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com