प्राधिकरणाची जागा विकल्याप्रकरणी भाजप नगरसेवकासह दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा असतानाही ती स्वतःची असल्याचे दाखवून भाजप नगरसेवकाने कुलमुखत्यारपत्र, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत तयार केले.
Crime
CrimeSakal

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा (Authority Land) असतानाही ती स्वतःची असल्याचे दाखवून भाजप नगरसेवकाने (BJP Corporator) कुलमुखत्यारपत्र, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत तयार केले. त्याद्वारे ती जागा विकून (Land Selling) १५ लाख ८० हजार रुपये उकळल्याप्रकरणी भाजप नगरसेवकासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक (Police Arrested) केली. (BJP Corporator and Two others Arrested for Selling Authority Land)

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय-४२, रा. भोसरी) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय-३८, रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) यांना अटक केली आहे. तर, रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय-४०) याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र लांडगे हे भोसरीतील प्रभाग क्रमांक सहामधून भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सर्व्हे नं. २२ मधील ९३६ चौ. फूट जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे शर्मा व ठाकूरला १५ लाख ८० हजार रूपयांना विकली. जागेवर अतिक्रमण करून शर्मा व ठाकूरने एक हजार ८७२ चौ. फूट बांधकाम केले.

Crime
कालावधी वाढल्याने मावळात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली

त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून मिळकत कर पावती बनवून घेतली. तसेच महावितरणकडून वीजजोडही घेतले. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com