'गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळं फासू', कुणी दिला हा इशारा वाचा...

टीम ई-सकाळ
Thursday, 25 June 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पिपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला.

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा पिपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मोरो आंदोलन केले. पडळकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही राष्ट्रवादी कॉंग्रेस व युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस लाला चिंचवडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, मयुर जाधव, निखील दळवी, नाना वाकडकर, नवनाथ वाळूजकर आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाघेरे म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षपार्ह बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत होत नाही. मात्र, पहिली चुक पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीस यांच्या डोक्‍यात सत्तेची हवा घुसली आणि त्यांनी केली होती. त्यांनी पवार साहेबांचे राजकारण संपले, असे म्हटले होते. त्याचे प्रायचित्त त्यांना मिळाले व त्यांना खुर्चीवरून खाली बसावे लागले. पवार साहेबांचे राजकारण संपले असा भाजपचा प्रचाराने महाराष्ट्रातील शेतकरी राजा, नवीन युवक व माता-भगिनींना रुचला नाही आणि नियतीने त्यांची खुर्चीच हिरावून घेतली. आता तशीच खुर्चीची हवा नव्याने आमदार झालेल्या नवनाथ पडळकर यांच्या डोक्‍यात घुसली आहे का? त्यांनी पवार साहेबांवर टीका करताना स्वतःची उंची तपासावी. केलेल्या वक्तव्याचे जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा वाघेरे यांनी दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पडळकरांनी आत्मपरीक्षण करावे 

माजी महापौर व विद्यमान नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, "भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलेले आहे. हे त्यांच अज्ञान आहे. त्यांना भाजपाने विधान परिषदेची आमदारकी दिली याचा अर्थ उचली जीभ लावली टाळ्याला याच्यासाठी दिली नाही. यश हे माणसाला पचवता आले पाहिजे. आमदारकी मिळाली म्हणजे काहीही बोलायला दिली असे नाही. ज्या वेळेला डिपॉझीट जप्त झाले होते, त्यानंतर आमदारकी मिळाल्यानंतर आज यांना हे सुचतंय. त्यांनी स्वत:ची लायकी आधी बघावी. आत्मपरीक्षण करावे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Gopichand Padalkar's protested by NCP Pimpri-Chinchwad city