

BJP Nominated Corporator Selection Pimpri Chinchwad
esakal
पिंपरी : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून २० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी सात नावे दिली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आहे. उमेदवारी वाटपात डावलल्याची तक्रार, पूर्वीच्या आश्वासनाची आठवण आणि बंडखोरांना पदे देण्यास विरोध करीत सातही जागांवर निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सभागृहात नावे येण्यापूर्वीच भाजपमधील पदवाटपाची रस्सीखेच तीव्र झाल्याचे चित्र आहे.