Pimpri : भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimrpi

भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी शिवसेना व महविकास आघाडी ठाकरे सरकारवर आणि त्यांचे मंत्री व काही अधिकाऱ्यांवर रविवारी भ्रष्टाराचे आरोप केले. ‘महावसुली सरकारचे घोटाळे’ या पुस्तकिच्या प्रतींचे त्यांनी वाटप केले. तर, महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचराचे आरोप करत भाजप कार्यलयाच्या प्रवेशद्वारावर काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकंमेकांवर आरोप करत घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला.

भाजपचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुखांना सोमय्या यांनी रविवारी पक्षाच्या मोरवाडीतील कार्यलयाच्या आवारात आयोजित बैठकीत मार्गदर्शन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्यासह ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरत वाहनांना वाट करून दिली. या वेळी झालेल्या झटापटीत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक सचिन भोसले यांचा शर्ट फाटला. आंदोलन संपल्यावर त्यांनी शर्ट बदलला. दरम्यान, भाजप कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर थांबून सोमय्या पान ८ वर

‘निवेदन स्विकारले नाही’

महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करावी, याबाबतचे निवेदन किरिट सोमय्या यांना देण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यांनी निवेदन स्विकारले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. सोमय्या व भाजपच्या विरोधात आंदोलन केले, असे शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले. आंदोलकांमध्ये भोसले यांच्यासह सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, वैशाली मराठे, उर्मिला काळभोर, रोमी संधू आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

loading image
go to top