चित्रा वाघ यांच्या ट्विटमुळे भाजपचीच कोंडी; आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3/13, आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार, असे ट्विट करीत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.

पिंपरी : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3/13, आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार, असे ट्विट करीत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. मात्र, मागील वर्षी भाजपची सत्ता असताना याच आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात 47 खून आणि 121 बलात्काराच्या घटना घडल्याचे समोर आल्याने वाघ यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांनी स्वत:च्याच पक्षाची कोंडी केल्याचे दिसून येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वाघ यांनी सोमवारी सकाळी 'महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे 3/13, आठ महिन्यांत पिंपरी-चिंचवडला 44 खून आणि 87 बलात्कार, तर नगरला कोविड सेंटरचं पेटवून दिलंय. आपल्या राज्यात कायद्याची भीती, धाक उरलेला नाही जरा इतरांची धुणी धुवून झाली असतील तर आता आपल्या घरात लक्ष द्या' असे ट्विट मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर उद्देशून केले. यामुळे खळबळ उडाली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्ह्यांची मागील वर्षाची आकडेवारी समोर आल्यानंतर वाघ यांनी त्यांच्याच स्वपक्षाचीच कोंडी केल्याचे स्पष्ट झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील वर्षी राज्यात भाजपची सत्ता असताना 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीत शहरात खुनाच्या 47, तर बलात्काराच्या तब्बल 121 घटनांची नोंद झाली. यंदाच्या वर्षी याच आठ महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा खुनाचे 44 तर बलात्काराचे 87 गुन्हे घडले आहेत. त्यामुळे टीका करून आघाडी सरकारची कोंडी करण्याचा चित्रा वाघ यांनी केलेला प्रयत्न फसला असून उलट त्यांनी स्वत:च्याच पक्षाची कोंडी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's controversy over Chitra Wagh's tweet