esakal | कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपाचा ‘आधार’; महेश लांडगे
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Landage

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपाचा ‘आधार’; महेश लांडगे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या शहरातील मुलांना भारतीय जनता पक्ष (BJP) आता ‘आधार’ (Support) देणार आहे. संबंधित मुलांचे शैक्षणिक पालकत्व (Parenting) स्वीकारण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी दिली. (BJPs support to children orphaned by corona Mahesh Landage)

भाजपच्या केंद्रातील सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कार्यकर्त्यांनी कोणताही सोहळा न करता कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्यासह गरिबांना मदत करावी, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शहर भाजपानेही पुढाकार घेतला आहे. लांडगे म्हणाले, ‘‘शहरात कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांची माहिती घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची मदत घेण्यात येईल. प्रभाग स्तरावर माहिती घेण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी पुढे यावे. ज्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिकदृष्टया पालकत्व स्वीकारता येईल. यासह संबंधित मुलांना सर्वदृष्टीने आधार देण्याबाबत कार्यवाही करता येईल. यासाठी संघटन सरचिटणीस अमोल थोरात (८०८७०२३२३१) यांच्याशी संपर्क साधावा.’