

Political Clash Erupts Over Tender Rates in Pimpri-Chinchwad Civic Body
sakal
पिंपरी: मोशी प्राधिकरणातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्थापत्य व विद्युतविषयक कामे केली जाणार आहेत. त्याच्या निविदा प्रक्रियेवरून स्थायी समिती सभेत बुधवारी (ता. ११) सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आमने-सामने आले. निविदा प्रक्रिया ठेकेदारधार्जिणी असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतल्याने संबंधित दोन्ही विषय तहकूब करण्याची नामुष्की भाजपवर आली.